राहुल गांधीजींना कितीही कोंडीत पकडले तरी ते मोठे होणारच-जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
बीड । प्रतिनिधी
महाविकास आघाडी होवू किंवा नाही, कार्यकर्त्यांनो कामाला लागा. येणारा काळ आपलाच आहे. जर महाविकास आघाडी झाली तर बीड जिल्ह्यात दोन जागा आपल्या असतील अन् महाविकास आघाडी झाली नाही तर आपण स्वबळावर संपूर्ण जागा मोठ्या ताकतीने लढायच्या आहेत. असे काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या. तर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, आपले नेते राहुलजी गांधी यांना मोदी अन् त्यांच्या यंत्रणेने कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधी हे मोठे होत आहेत. आपण त्यांच्यासाठी आणि देशासाठी रात्रन् दिवस कष्ठ करुन पक्ष वाढवू. तुम्ही जिल्हा परिषद, पंचायत समितीसह आगामी निवडणूकीच्या तयारीला लागा आघाडीच्या जागा वाटपाचे मी पहातो असे म्हणत जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले.
ते काँग्रेसच्या वतीने बीड शहरातील हॉटेल गोल्डण चॉईस येथे गुरुवार दि. 1 जून रोजी दुपारी 5 वाजता अयोजीत केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील, आदित्य पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना खा. रजनीताई पाटील म्हणाल्या की, महाविकास आघाडी होईल अन् बीड जिल्ह्यासाठी आपण दोन जागेवर दावा करणार आहोत. अन् त्या मी मिळवणार आहे. तुम्ही तयारीला लागा. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या माध्यमातून बीडच्या काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. असे म्हणत जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या कार्यचे कौतूकही खा. पाटील यांनी केले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, देवाला आम्हीही माणतो मात्र संसदेच्या उद्घाटनाला डॉ. बाबासाहेबांची घटना सविधान घेवून गेले असेत तर आम्हालाही बरे वाटले असते. भाजपाने अधिवाशींचे राष्ट्रपती केले, मात्र संसदेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांना बोलावले नाही. भाजप हे फक्त आधिवाशींबदद्ल आम्हाला प्रेम असल्याचा ढोंगीपणा करत आहे. असेही खा. रजनीताई पाटील म्हणाल्या. तर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना पक्ष घराघरात घेवून जाण्याचे अवाहन केले. येणार्या काळात आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. आपल्या बीड जिल्ह्याचं एकमेव मोठं नेतृत्व असलेल्या खा. रजनीताई आपल्या पाठीशी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आगामी निवडणूका लढू अन् जिंकूही असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.
योवळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील, आदित्य पाटील, नवनाथ थोटे, जुबेरभाई चाऊस, फरीद देशमुख, अनिल मुंडे, पशुपतीनाथ दांगट, बाळासाहेब ठोंबरे, केदार भास्कर, राहुल टेकाळे, प्रा. संभाजी जाधव, गणेश बजगुडे, परवेेज कुरेशी, जिजा आंधळे, नारायण होके, राहुल जाधव, उमर चाऊस, रवि ढोबळे, प्रा. अनिल जाधव, किशोर शिंदे, महेश बेद्रे, अशेाक केकाण, सविता कराड, विद्या चव्हाण, मिना जायभाये, आमोल पाठक, गणेश करांडे, रनविदेव सर, श्रिनिवास बेदरे, दत्ता कांबळे, डॉ. मोटे, दादासाहेब ताकतोडे, हरी सावंत, गणेश जवकर, विष्णू मस्के, कानिफनाथ विघ्ने, भरत डवारे, फरान शेख, मोसीन शेख यांच्यासह सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष यांच्यास कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-
सर्वसामान्यांच्या मुलांना काँग्रेसमध्ये नेतृत्व करण्याची संधी- माजी मंत्री अशोकराव पाटील
काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस आवाज उठवत आहे. सर्वसामान्य माणसांंच्या मुलांना काँग्रेसमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली जाते. सर्वसामान्य लोकांची मुले मोठे झाले पाहिजेत त्यांनी मोठ्या पदावर जाव यासाठी मी काम केले आहे. आणि करत आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते. राजेसाहेब देशमुख सारख सामान्याच्या पोराला मी जिल्ह्याच्या राजकारणात संधी दिली. ते सिध्द झाले. आत मी तुम्हाला नेता म्हणून पाहु इच्छीतो असे गौरोद्गार महाराष्ट्राचे माजी मंत्री काँग्रेसचे नेते मा.अशोकराव पाटील यांनी काढले.