Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रअनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीत 90 टक्क्याच्या पुढे मार्क पडल्यास दोन लाखाची...

अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीत 90 टक्क्याच्या पुढे मार्क पडल्यास दोन लाखाची स्कॉलरशिप

बीड (रिपोर्टर):- इयत्ता दहावीमध्ये अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 90 टक्के मार्क्स मिळाल्यानंतर त्याला दोन वर्षे दोन लाख रूपये मिळणार आहेत. अशा प्रकारचा शासन निर्णय राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला असल्याने इयत्ता दहावी नंतर ज्यांना डॉक्टर, इंजिनिअर अथवा मोठ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी सोपे होणार आहे. इयत्ता दहावीनंतर अभ्यासू विद्यार्थ्याला डॉक्टर इंजिनिअर होण्यासाठी हुशार असतांनाही केवळ नीट आणि सीईटीची भरमसाठ फिस असल्यामुळे विद्यार्थ्याला केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोचिंग क्लासला अ‍ॅडमिशन घेता येत नव्हते. त्यामुळे हुशार असूनही केवळ आर्थिक परिस्थिती खराब असल्याने डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहता येत नव्हते. किंवा ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येत नव्हते. ही बाब राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गांभीर्याने घेवून इयत्ता दहावीमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 90 टक्केच्या पुढे मार्क्स मिळाल्यानंतर त्याला नीट आणि सीईटी तयारी करण्यासाठी आणि खासगी कोचिंग क्लासेस लावण्यासाठी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन वर्षासाठी प्रतिवर्षी एक लाख रूपये दोन टप्प्यात आणि दुसर्‍या वर्षी एक लाख रूपये दोन टप्प्यात अकरावी बारावी या दोन वर्षासाठी दोन लाख रूपये विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभाग बार्टी या संस्थेकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून घेतल्या जाणार्‍या निर्णयाचे विद्यार्थी वर्गाकडून स्वागत होत असून या वर्षापासून शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!