राज्यात 96.94 तर औरंगाबाद विभागाचाही 96.94 टक्के निकाल
औरंगाबाद (रिपोर्टर) राज्याचा इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. तर राज्याचा निकाल एकूण 96.94 टक्के इतका लागला आहे. आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाची सविस्तर माहिती दिली. उत्तीर्ण मुलींचा 97.96 टक्के तर मुलांचा 96.06 टक्के निकाल लागला आहे. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,84,790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,68,977 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 54,159 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 52.351 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 41,390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
बीड जिल्ह्याचा 97 टक्के निकाल
बीड जिल्ह्यातील 40 हजार 908 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. यातील 40 हजार 331 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील 39204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 75 टक्केच्या पुढे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्यांची संख्या 24234 असून तर प्रथम येणारे विद्यार्थ्यांची संख्या 11 हजार 291, द्वितीय श्रेणीत 3 हजार 288 विद्यार्थी पास झाले आहे तर फक्त पास या श्रेणीमध्ये 391 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा 97.20 टक्के आहे. औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा क्रमांक द्वितीय आहे.
विभागानुसार निकाल
पुणे: 96.96%
नागपूर: 97%
औरंगाबाद: 96.33%
मुंबई: 96.94%
कोल्हापूर: 98.50%
अमरावती: 96.81 %
नाशिक: 95.90%
लातूर: 97.27%
कोकण: 99.27%
राज्यातील 29 शाळांचा निकाल 0 टक्के, तर 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के
राज्यातील 29 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे. 1 ते 10 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या एक आहे. पाच शाळांमध्ये 10 ते 20 टक्के निकाल लागला. 4 शाळांमध्ये 20-30 टक्के निकाल लागला आहे. 18 शाळांमध्ये 30-40 टक्के, 38 शाळांचा निकाल 40-50 टक्के, 41 शाळांचा निकाल 50-60 टक्के निकाल, 123 शाळांचा निकाल 60-70 टक्के लागला. याशिवाय 70-80 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 321, 80-90 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 1330, 90-99.99 टक्के निकाल असणार्या शाळांची संख्या 8 हजार 801 इतकी आहे. 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 12 हजार 210 इतकी आहे.