बीड (रिपोर्टर) खासगी शिक्षण संस्था चालकाकडून पालकांची लूट केली जात असतानाही शिक्षण विभाग डोळेझाक करत आहे. या प्रकरणी दोषी शिक्षण संस्थेविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे तर एमआयएमच्या वतीने बीड नगरपालिकेच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे.
बीड शहरासह जिल्हाभरातील खासगी शिक्षण संस्था पालकांची आर्थिक लूट करू लागले आहेत. या प्रकरणी शिक्षणाधिकारी मात्र कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसून येत नाहीत. शिक्षण विभागाने डोनेशन घेणार्या संस्थांविरोधात कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी डॉ. गणेश ढवळे, विनोद चर्हाटकर, रामनाथ खोड, मोहम्मद बीडकर, सय्यद आबेद बीडकर, शेख मुबीन, बलभीम उबाळे, सय्यद आझम, तादंळे सुदाम यांच्यासह आदींची उपस्थिती आहे तर एमआयएमच्या वतीने वार्ड क्र. 21 मध्ये कामाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या वेळी बिस्मिल्लाहबी पाशा, हाफिज अशफाक, शेख अमर, अय्युब पठाण यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.