अधिकारी व कर्मचार्यांकडून ग्राहकांना दम देऊन सक्तीची वसुली
गेवराई, (रिपोर्टर) सिरसदेवी येथील महावितरण केंद्राचा सावळा गोंधळ उघड झाला असून नेहमीत वीज बील भरणा केलेल्या ग्राहकांना अतिरिक्त वीज बील दिले आहे.यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून महावितरण सिरसदेवी येथील 33 के व्ही केंद्राचे इंजिनिअर यांनी कडक वसुली करून ही वीज बील भरून घेतले असताना पुन्हा तेवढेच बील येत असल्याने ग्राहक नाहक त्रास सहन करत आहेत. वीज बील नेहमीत भरून ही जास्तीच बील येत असल्याने सिरसदेवी येथील 33 उपकेंद्रातील कर्मचारी सावळा गोंधळ करून ग्राहकांकडून दम देऊन सक्तीची वसुली करत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष निर्माण होत आहे.
तालुक्यात महावितरण कडून सक्तीची वसुली करण्यात आली. यामध्ये ग्राहकांकडून कोटी रुपयांचे वीज बील भरून घेतले. सिरसदेवी येथील 33 के व्ही केंद्राचे इंजिनिअर भयताडे यांनी तर वीज बील न भरलेले अनेक गावे महिनाभर बंद ठेवली होती. वसुली झाल्यानंतरच या गावांना वीज जोडली होती. यामुळे बहुतांश ग्राहक वीज बील भरून नेहमीत झाले होते. यानंतर ही ग्राहक महिन्याला वीज बील भरत आहेत. परंतु नेहमीत बील भरून ही पुन्हा वाढीव बील आल्याने ग्राहक महावितरणवर संताप व्यक्त करत आहेत. तालुक्यातील लक्ष्मण अंकुश लाड (रा.सिरसदेवी) यांनी नेहमीत बील भरणा केला होता. त्यांनी मागील मे महिन्यात 155 युनिटचे 1680 रुपये भरणा केला होता.परंतु त्यांना जून महिन्यात 4347 युनिट आले असतांना 48340 रुपयांचे बील आले आहे. त्यांनी 33 के व्ही केंद्र सिरसदेवी येथील इंजिनिअर भयताडे यांना विचारपूस केली असता नेहमीत रिडींग घेणारे ठेकेदार यांनी बर्याच ग्राहकांना रीडिंगनुसार बील दिले नव्हते. त्यामुळे ग्राहकांचे युनिट शिल्लक राहत होते. ते ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्याने त्यावर मी कारवाई केली आहे. दुसरे ठेकेदार यांनी चालू व मागील शिल्लक रिडींग दिल्यामुळे त्यांना जून महिन्यात मिटर रीडिंगनुसार बील आले आहे. यामुळे ग्राहकांनी सवलत घेवून दोन टप्प्यात जे बील आले ते भरणा करावा. तर ठेकेदार यांनी केलेल्या चुकांमुळे वाढीव बील ग्राहकांच्या माती मारले जात असून संबंधित इंजिनिअर वर्ष भर या ठेकेदार यांच्या कामावर लक्ष का देत नव्हते असा सवाल उपस्थित होत असून 33 के व्ही केंद्रात सावळा गोंधळ चालू असल्याचे लक्षात येत आहे.