जामखेड -ऑनलाइन रिपोर्टर
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासात अनेक तरुण-तरुणी जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली असून, “फाशी”चा रील बनवताना एका युवकाला प्रत्यक्ष फाशी बसली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तातडीने या युवकाला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याची प्रकृती गंभीर आहे.
प्रकाश बुडा असे या रील बनवणाऱ्या युवकाचे नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने फाशी घेण्याचा बनाव करत स्वतःचे चित्रीकरण सुरू केले होते… मात्र, दोरी गळ्याला अडकली आणि तो शुद्ध हरपून फासावर लटकला…दरम्यान घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियातील हव्यासापोटी जीव धोकात घालू नये, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केलंय.












