वर्षातल्या दोन परीक्षापैकी कुठलीही एक परीक्षा विद्यार्थ्याला देता येईल
मुंबई (रिपोर्टर) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबद्दल केद्रीय शिक्षा मंत्रींनी मोठं वक्तव्य केलं असून त्यांनी ’दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला वर्षातून दोनदा बसणे बंधनकारक असणार नाही’, असे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. ते पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि एकाच संधी असल्याच्या भीतीने विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली होती.
दरम्यान प्रधान यांनी सांगितले की, सेंट्रल अॅडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन ची पुनर्रचना केली जात आहे कारण त्याची जुनी आवृत्ती खूप विस्तृत आहे आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या मागण्या वेगळ्या आहेत.
अशा वेळी जेव्हा आपण एनईपी सोबत आदर्श स्वरुपाचे बदल करत आहोत अशावेळी एनईपी देखील सुधारणे आवश्यक आहे. ते म्हणाले, एनईपीच्या अंमलबजावणीवर काही राज्यांनी घेतलेले आक्षेप राजकीय आहेत, शैक्षणिक नाहीत. त्यांचा आक्षेप काय आहे हे मला अद्याप समजू शकले नाही, पश्चिम बंगालचा पर्यायी डॉक्युमेंट हा देखील 99 टक्के एनईपी सारखाच आहे.कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांवर बोलताना प्रधान म्हणाले की, कुठल्याही परिस्थीतीमध्ये कोणाचाही जीव गेला नाही पाहीजे, ती आपली मुले आहेत, विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले की, परदेशी विद्यापीठांसाठी भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जात आहे. याबद्दल लवकरच अधिसूचित केले जाईल. ते म्हणाले की आम्ही आदर्श स्वरुपाचे बदल करणार आहोत, त्यामुळे सर्व शक्यता पडताळून आणि सर्व शंका दूर करून आम्ही पुढे जाऊ. ते पुढे म्हणाले, दोन आयआयटी आधीच परदेशात त्यांचे कॅम्पस स्थापन करण्याच्या पुढील टप्प्यात आहेत. ज्यांनी इच्छा व्यक्त केल्या आहेत अशा अनेक देशांशी चर्चा सुरू आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय त्यांच्याशी समन्वय साधत आहे.