बीड (रिपोर्टर)- सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना सिरसाळा येथे अवैध गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकाला पाठवून सिरसाळा येथे दोन घरात छापे मारले असता 10 लाख 14 हजार 600 रुपयांचा गुटखा मिळून आला आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना सिरसाळा येथे अवैध गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकातील पोलीस हवालदार अतिषकुमार देशमुख, महिला पोलीस हवालदार आशा घुले, पोलीस अंमलदार संतराम थापडे, माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश विधाटे, पोलीस हवालदार राम भंडाणे यांना पाठवून फेरोज हरुण शेख (रा. मदिना नगर, सिरसाळा) व वसीम रहिमोद्दीन सिद्दीकी (रा. आझादनगर, सिरसाळा) यांच्या घरावर छापा मारला असता घरामध्ये एकूण 10 लाख 14 हजार 600 रुपयांचा गुटखा मिळून आला. या प्रकरणी अतिषकुमार देशमुख आणि संतराम थापडे यांच्या फिर्यादीवरून 8 आरोपींविरोधात सिरसाळा पोलिसात गु.र.नं. 221/2023, कलम 328, 272, 73, 188, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी आणि त्यांच्या टीमने केली आहे.