नेकनूर (रिपोर्टर)- ग्रामपंचायतचा कारभार सुधारण्यासाठी पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खामगावच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण दिले जाते, मात्र आज नेकनूर येथे या प्रशिक्षणाकडे सरपंचांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान संबंधितांना कळविण्यात आले नाही की, हे प्रशिक्षण फक्त कागदोपत्री दाखवले जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानअंतर्गत पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खामगाव या प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सरपंच, सदस्य व ग्रा.पं. कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात टप्प्यानुसार प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण घेण्याचे काम एका संस्थेला दिले गेले आहे. आज बंकटस्वामी मठात नेकनूर परिसरातील सरपंचांचे प्रशिक्षण आयोजीत केले होते. या प्रशिक्षणाकडे सर्वांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. केवळ कागदोपत्री प्रशिक्षण आयोजीत केले गेले होते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.