शिरूर कासार (रिपोर्टर) तालुक्यातील ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या विवीध मागण्या मान्य करण्यासाठी शहरातील जिजामाता चौकात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.गळीत हंगाम 2023-2024 या वर्षासाठी तालुक्यातील ऊसतोड मजुर, कामगार आणि मुकादामांच्या विवीध प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे शासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत.ज्या मध्ये ऊसतोडणी व वाहतूकीच्या पूर्वीच्या भावाच्या दुप्पट वाढ करण्यात यावी.मुकादमांच्या कमिशन मध्ये पसंत्तीस टक्के वाढ करावी.ऊसतोड आणि ऊस वाहतूक करणार्या सर्व मजुरांच्या विम्याची रक्कम संबधित कारखान्यामार्फत भरण्यात यावी.या मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्या लवकरात लवकर मान्य करून त्रिसदस्यी समितीची बैठक घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागण्यासाठी आज जिजामाता चौक शिरूर कासार येथे रस्ता रोको करून प्रशासनाच्या वतीने सदरील निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी बहुसंख्येने मुकादम संघटनेचे अध्यक्ष दशरथ वनवे, बाबुराव केदार,निवृत्ती ढाकणे,आश्रु कदम, प्रकाश खेडकर,विजय ढाकणे,संपत केदार,नारायण बडे,अशोक केदार,राजाभाऊ विघ्ने,भीमराव केदार नवनाथ खेडकर,मधुकर बडे यांच्या सह ऊसतोड कामगार उपस्थित होते.