बीड (रिपोर्टर): मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर पदमबाई जाधवसह आदींचे आमरण उपोषण सुरू होते. दरम्यान या वेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी मध्यस्थी करून पोलीस अधिक्षक कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचे निर्देशित केल्यानंतर जाधवसह आदी कलेक्टर कचेरीसमोर उपोषणाला बसले.
शिवाजीनगर पोलीस ठाणेअंतर्गत काही दिवसांपूर्वी आसाराम गायकवाड यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. एका गुन्ह्यात त्यांना अटक होऊन जामीन झालेली आहे. इतर गुन्ह्यात अटक करण्यात यावी या मागणीसाठी पदमबाई जाधवसह आदींचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. या वेळी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी मध्यस्थी करून त्यांचे निवेदन स्वीकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचे निर्देशित केले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.