Home बीड कुमावत यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली, मी बाळासाहेबांचा शिवसेनिक -कुंडलिक...

कुमावत यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली, मी बाळासाहेबांचा शिवसेनिक -कुंडलिक खांडे

बीड -ऑनलाईन रिपोर्टर
आपण सामान्य कुटूंबातून आलो, घरात कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण नऊ निवडणुका लढलो व सात जिंकलो. पक्षासाठी आपण करत असलेले काम प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत होते. त्यामळे मला कुठल्यातरी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरु होता, शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच आपले नाव गुटखा प्रकरणात गोवल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी .पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकाऱ्यांचे काम उत्तम असून सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मात्र पक्षाला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली? असा सावलही खांडे यांनी केला.
१६ नाव्हेंबरला केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी नांदूरघाट (ता. केज) येथे दोन ठिकाणी छापे टाकून गुटखा पकडला. त्यानंतर बीडजवळील गोदामांवरही छापे टाकले. यावरुन केज पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद होऊन एका गुन्ह्यात तत्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आरोपींच्या यादीत आले.त्यानंतर पक्षाने त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली असून बुधवारी (ता. २४) खांडे यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायलायाने कायमस्वरुपी अटकपूर्व जामिन मंजूर केला. त्यानंतर त्यांनी बीड, गेवराई व आष्टी – पाटोदा – शिरुर कासार मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेत कुंडलिक खांडे यांनी भूमिका मांडली.

मला कसलाही राजकीय वारसा नाही, सामान्य शेतकरी कुटुंबातून मी शिवसेने सारख्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणार्या पक्षाचा जिल्हाप्रमुख बनलो. पद मिळाल्यानंतर माझ्या काम करण्याच्या पध्दतीतून आणि दिवसातील 16 तास काम करून शिवसेचा जिल्हांप्रमुख पक्ष संघटनेसाठी काय करू शकतो हे दाखवून दिले. झपाटून गेल्याप्रमाणे काम करण्याच्या माझ्या या पध्दतीमुळे काही जणांना ते रुचले नव्हते. याच लोकांचे काही तरी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचे प्रत्यन सुरू होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे हे लोक माझ्या विरोधात तक्रारी करत, विरोधात निवेदनही देत होते. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माझ्यावर आणि माझ्या काम करण्याच्या पध्दतीवर विश्‍वास असल्याने त्यांची डाळ शिजत नव्हती. यात गुटखा प्रकरण घडले. या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नसताना मला गोवण्यात आले. केवळ महिलेवर अन्याय होत आहे, म्हणून मी तिथे गेलो. या व्यतिरिक्त या प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. गुटख्याचे गोडावून माझे नाही, पडलेली गाडी माझी नाही. असे असतानाही थेट माझ्यावर दाखल केलेला गुन्हा षडयंत्राचा भाग होता. न्यायालयाने यात जामीन मंजूर केला. आगामी काळात दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी होणार आहे. षडयंत्रकारी लोक एखाद्या नेतृत्वाला परेशान करू शकतात परंंतू पराजित कदापीही करू शकत नाही. माध्यमांमधून चुकीची चर्चा सुरु आहे. शिवसेनेतील सर्व पदाधिकार्यांचा मला पाठींबा आहे. माझ्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. जर माझे पद अबाधित राहिले सर्वांना सोबत घेवून आणि अथवा मला पदावरुन दुर केल्यासही ज्या इच्छुकाची निवड होईल त्यांच्या सोबत मी एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. कारण मी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेबांचा कडवट सैनिक आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब आणि ना.आदित्यजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

दोष सिध्द झाला तर
राजकारणातून सन्यास घेईल
गुटखा प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. या प्रकरणात मी दोषी आढळलो तर राजकारणातून सन्यास घेईल. परंतू माझ्यावर गुन्हा दाखल करणार्या अधिकार्याने देखील मी निर्दोष सिध्द झाल्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे माझे आव्हान आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!