जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वरवटीकरांचे आंदोलन
बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाला तात्काळ आरक्षण घोषीत करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन होत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वरवटी येथील गावकर्यांनी साखळी उपोषण केले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींसमोर अराक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये पाचेगाव, कोपरा, दगडगाव, इरगाव, पाडळसिंगी, बर्हाणपूर यासह आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासनू मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. आज जिलहाधिकारी कार्यालयासमोर वरवटी येथील गावकर्यांनी साखळी उपोषण केले. या उपोषणामध्ये गावसह शहरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींसमोर साखळी उपोषण सुरू आहे यात औरंगपूर कुकडा, कोपरा, दगडगाव, इरगाव, पाडळसिंगी, बर्हाणपूर, आहेर वाहेगाव, तळवट बोरगाव, एरंडगाव, टाकळगाव, हिरापूर, आमला वाहेगाव, चिंचोली, खेर्डा, खेर्डावाडी, बुदु्रुक पाचेगाव, नांदलगाव, रामेश्वर, मालेगाव, जळगाव, डिग्रस, काजळवाडी यासह आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे साखळी उपोषण करण्यात येत आहे.