परळी -रिपोर्टर
मराठा आरक्षण आंदोलनास जिल्ह्यात हिंसक वळण लागल्यानंतर परळी वैजनाथ आगारातील सर्व बसेस रविवार (29 ऑक्टोबर) पासून बंद आहेत. परळी शहरातील बस स्थानकातून परळी ते धर्मापुरी, परळी ते बीड, परभणी ते तुळजापूर व इतर मार्गांवरही सकाळपासून बस सेवा सुरु होती. प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.
परळी हे बारा ज्योतिलिंगापैकी एक क्षेत्र, औष्णिक वीजनिर्मिती केंद्र असल्याने राज्यातून मोठी वाहतूक परळी आगारातून होते. लांब पल्ला व तालुक्यातील खेडेगावांसाठी परळी आगारात एकूण 60 बसेस आहेत. शुक्रवार दि.03 नोव्हेंबर पासून परळीत बस सेवा सुरळीत सुरु झाली आहे.