Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडएसटी कर्मचार्‍यांशी चर्चा करण्यासाठी महामंडळाचे संचालक बीडमध्ये

एसटी कर्मचार्‍यांशी चर्चा करण्यासाठी महामंडळाचे संचालक बीडमध्ये


बीड (रिपोर्टर)- एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप सुरुच असून या संपावर अद्याप कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. महामंडळाचे महासंचालक हे कालपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. ते जिल्हापातळीवर जावून कर्मचारी संघटनेशी संपाबाबत चर्चा करू लागले. आज त्यांनी बीड येथील कर्मचार्‍यांशी संवाद साधला. या वेळी कर्मचार्‍यांची व संघटनेच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


गेल्या एक महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर असल्याने या संपामुळे वाहतूक पुर्णत: खोळंबून पडली. महामंडळाचे महिनाभरात कोट्यवधींचे नुकसान झाले. कर्मचारी संघटना विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संपाबाबत तोडगा निघेना. महामंडळाचे महासंचालक शेखर चन्ने हे कालपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी काल औरंगाबाद येथील एसटीच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधल्यानंतर ते आज बीड येथे दाखल झाले. बीड येथे आंदोलनकर्त्यांची त्यांनी भेट घेऊन संपाच्या संदर्भात चर्चा केली. या वेळी कर्मचार्‍यांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचारी आणि महासंचालक यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही.

Most Popular

error: Content is protected !!