नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर ग्रामपंचायत गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीकडे होती मात्र या पंचवार्षिकमध्ये नेकनूरकरांनी सत्ता परिवर्तन करत एकहाती ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडे दिली आहे. सरपंचपदी अनिता सुंदर लांडगे यांची निवड झाली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून नेकनूरमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. यावर्षी येथे तिरंगी लढत झाली. त्यामध्ये अजितदादा गटाकडून सरपंचपदासाठी उभा राहिलेल्या अनिता सुंदर लांडगे यांची सरपंचपदी निवड झाली आहे त्याचबरोबर मुकुंद काळे, मुजीब अत्तार, प्रकाश राऊत, सचीन शिंदे, सय्यद तौसिफ बबलू, जयदीप काळे, सय्यद साजेद अली बाबुभाई, शेख इजहारोद्दीन जहागीरदार, सायली जितेंद्र होमकार आणि शिवाजी शिंदे हे अजितदादा पवार गटाकडून सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला दोन सदस्यांवर समाधान मानावे लागले. त्यामध्ये अशोक शिंदे आणि चक्रधर शिंदे यांचा विजय झाला आहे. तिसरे पॅनल शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) होते. यामध्ये शेख अरशद राजाभैय्या, सय्यद नदीम मंडोला आणि सायमा फेरोज पठाण यांची सदस्य म्हणून निवड झाली तर नेकनूरकरांनी तीन अपक्ष सदस्यांनाही निवडून दिचले आहे. त्यामध्ये सय्यद रहीमभाईआणि जय निर्मळ यांची वर्णी लागली.