Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडभगवान भक्तीगडाच्या दान पेट्या पळवणार्‍या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

भगवान भक्तीगडाच्या दान पेट्या पळवणार्‍या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या


अंमळनेर पोलिसांची कारवाई
बीड (रिपोर्टर) भगवान भक्तीगड येथील तीन दानपेट्या काल रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या. या प्रकरणाचा एपीआय गोरक्ष पालवे यांनी छडा लावला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्या चोरट्यांकडूएन एक पेटी जप्त करत इतर दोन पेट्या करंजवणच्या विहिरीत टाकल्याचे सांगितले. विहिरी तुडूंब भरलेली असल्याने त्याचे पाणी उपसणे सध्या सुरू आहे.


सावरगाव घाट येथील श्रीसंत भगवान भक्तीगड समोर तीन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी दि. ८ जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी विनायक विठ्ठलराव सानप (वय ५१ वर्षे, धंदा शेती) यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख गोरक्ष पालवे यांनी करत तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांनी तीन पेट्या चोरून नेल्याची कबुली दिली. त्यातील एक पेटी पोलिसांनी ताब्यात घेतली असून इतर दोन पेट्यांचा शोध सुरू आहे. त्यापैकी एक पेटी करंजवणच्या विहिरीत टाकली असल्याचे चोरट्यांनी सांगितले. ती विहिर तुडुंब रभलेली असल्याने त्याचे पाणी उपसणे सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!