नियमित कर्जाची परत फेड करणार्या शेतकर्यांना 50 हजाराचे अनुदान
बीड (रिपोर्टर) राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये महत्वपुर्ण निर्णय झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगराध्यक्ष आणि सरपंचपदाच्या निवडणुका थेट जनतेतून होणार असल्याची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारने कर कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करून पेट्रोल पाच रुपयाने तर डिझेल तीन रुपयाने राज्यात स्वस्त होणार आहे. केंद्राच्या अन्य योजना तितक्याच ताकतीने राबवल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सचिवांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅबिेनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. केेंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातील युती सरकार इंधनावरील करामध्ये कपात करत असल्याचे सांगितले. पेट्रोलवरील कर पाच रुपयाने तर डिझेलवरील कर तीन रुपयाने कपात करत असल्याचे सांगत या करकपातीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर सहा हजार रुपयांचा भार पडणार असल्याचे सांगितले. परंतु सर्वसामान्य नागरिकांना या कर कपातीमुळे बराचसा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी या वेळी व्यक्त करत आणखी एक मोठी घोषणा केली. राज्यातल्या नगराध्यक्षपदाच्या आणि सरपंचपदाच्या निवडणुका थेट जनतेतून होणार असल्याचे सांगून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला छेद दिला. आगामी नगरशध्यक्षपदाची आणि सरपंचपदाची निवडणूक आता थेट जनतेतून होणार आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना युद्ध पातळीवर राबवल्या जाणार असल्याचे सांगून 18 ते 59 वयोगटाती नागरिकांना येत्या 75 दिवसात बुस्टर डोस जलदगतीने दिले जाणार असल्याचे सांगितले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवलं जाणार असल्याचे सांगत अमृतजल अभियानांतर्गत पाणीपुरवठा मल निस्सारीकरण यावर भर दिला जाणार असल्याचेही या वेळी एकनाथ शिंदेंनी सांगितले.