गावागावात, घराघरात,भावाभावात भांडणे लावण्याचे, देवस्थानच्या जमिनी कार्यकर्त्यांच्या नावावर करण्याचे काम ह्याच मानसाने केले,पत्रकार परिषदेत स्थगिती च्या पत्रासह आ.आजबेंची माहिती
आष्टी ( रिपोर्टर ):-आष्टी तालुक्याची खुंटेफळची महत्वकांक्षी योजना असून मागिल 7 वर्षांपासून मिळत नसलेले पर्यावरण मान्यता मिळवून घेतली अडीच वर्ष मी झटलो या योजनेमुळे 70 गावांना फायदा होणार असून तालुक्याच्या हिताचे काम आहे.या कामाला स्थगिती देण्याचे पाप आ.सुरेश धस यांनी केले आहे.यासह तालुक्यातील एस.टी स्टॅन्ड,व विविध विकास कामांना आत्तापर्यंत खोडा घालण्याचे काम आ.सुरेश धस यांनी केले, जलसंधारण च्या 55 कोटी च्या विकास कामांना त्यांच्यामुळे स्थगिती मिळाली असून त्यांनी 15 वर्ष आमदार असताना एकही चांगले काम केले नाही,स्वजलधारा योजनेतून एकही योजनेतून पाणी पडले नाही त्यांच्या कार्यकाळात एकही चांगले काम केले नसून फक्त भ्रष्टाचार केला आहे.देवस्थानच्या जमिनी कार्यकर्त्यांच्या नावावर करण्याचे काम ही याच मानसाने केले असल्याचा आरोप आ.बाळासाहेब आजबे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले दि.17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले तालुक्यातील महत्वकांक्षी योजना असलेली खुंटेफळ योजना असून पर्यावरण मान्यतेसाठी 7 वर्ष लागले ति मान्यता मी 4 महिन्यात मिळवली आहे.70 गावांचा विकास होणा-या योजनेला स्थगिती देण्यासाठी आ.धसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून त्यांच्यामुळे या महत्वकांक्षी योजनेला स्थगिती दिली आहे.त्यांनी त्यांच्या 15 वर्ष आमदारकीच्या काळात एकही चांगले काम केले नसून भ्रष्टाचार केला आहे.तालुक्यातील एस टी स्टँड असेल यासह विविध योजना असतील त्या योजनांना खोडा घालण्याचे काम आ.सुरेश धसांनी केले असून गावागावात,भावाभावात, घराघरात भांडणे लावले,मी त्यांना जाहिर आवाहन करतो की तालुक्याच्या विकासात खोडा घालू नका थांबवलेली निविदा पुन्हा चालू करावी खुंटेफळच्या लोकांना जमिनी देऊ नका ह्यांनीच दौ-यामध्ये शैतक-यांना सांगितले त्याचे विडीओ माझ्याकडे आहेत.त्यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात फक्त 1 जळगावचा तलाव झाला तो ही तलाव व्यवस्थित झाला नाही देवस्थानच्या जमिनी कार्यकर्त्यांच्या नावावर करण्याचे काम ही आ.सुरेश धसांनीच केले आहे.आ.सुरेश धस म्हणजे तालुक्याच्या विकासाला लागलेली किड असल्याचा आरोप ही पत्रकार परिषदेत आ.आजबेंनी केला.