टाकरवन सर्कलमध्ये विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराच्या झंझावात
गेवराई, दि.08 (प्रतिनिधी) गोदाकाठचा भाग सिंचनाच्या दृष्टीने फार महत्वाचा असून या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड होते. या सर्व ऊसाचे गाळप करण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे आणि यापुढेही आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या प्रगतीचा विचार आम्ही सातत्याने केलेला आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील टाकरवन सर्कलमधील नागरीकांच्या सुविधेसाठी माजलगावमध्ये संपर्क कार्यालय सुरु करण्यात येईल. शिवछत्र परिवार हा वाड्या, वस्त्या व तांड्यांपासून ते गाव शहरांपर्यंत सर्वांच्या प्रगतीसाठी वचनबध्द आहे. विकासाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले. मतदार संघातील विविध गावच्या प्रचार दौर्यामध्ये मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी मतदार संघातील वारोळा, राजेगाव, सुर्डी, हिवरा, जोड तांडा, बाराभाई तांडा, पिरुनाईकतांडा, गव्हाणथडी, डुब्बाथडी, काळेगाव थडी, भगवाननगर आदी गावांचा प्रचार दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कचरे, ड.शरद चव्हाण, सरपंच शरद पवार, सुनिल तौर, माजी सभापती भागवत खुळे, माजी सभापती दत्तात्रय वराट, सरपंच गुलाब मोरे, संतोष जाधव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सलीम, राधेशाम घुमरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विविध कॉर्नर बैठकांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मतदार संघातील काही ग्रामपंचायतींचे विभक्तीकरण करून त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला त्यामुळे ग्रामपंचायत विकास योजनांच्या माध्यमातून हजारो रुपयांचा निधी या तांड्यांना मिळाला. याभागात सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी गोदावरी नदीवरही बॅरेजेस उभारले जातील. या कामासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे उद्याच्या मतदानाला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला आशिर्वाद द्या असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
मी सदैव विजयसिंह पंडित यांच्यासोबत -ड.प्रमोद तौर
===============
गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. टाकरवन सर्कल व संपुर्ण मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांच्यासारखे तरुण व उमदे नेतृत्व विधानसभेत जाणे महत्वाचे आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून टाकरवन सर्कलमधील मी व माझे संपुर्ण सहकारी विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी पराकाष्ठा करू, आम्ही सदैव विजयसिंह पंडित यांच्यासोबत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजलगाव तालुका सरचिटणीस ड.प्रमोद तौर यांनी केले.
कॉर्नर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद
============
महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या कॉर्नर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. यावेळी टाकरवन येथे संतोष खोमाड, कपिल आडागळे, योगेश कानडे, महादेव कदम, अनिरुद्र तौर, गोविंद तौर, चेअरमन तुकाराम तौर, मोहन जगताप मित्र मंडळाचे प्रकाश तौर, रखमाजी तौर, उपसरपंच संतप गायकवाड, वारोळा जोडतांडा येथे बाळू पवार, भारत चव्हाण, मारुती पवार, संजय राठोड, राजेगाव येथे संजय कचरे, मधुकर साळवे, शेख शब्बीर, कैलास मालू, प्रदिप साळवे, सुर्डी येथे सरपंच महादेव चौरे, उपसरपंच सुनिल गरड, प्रमोद गरड, संतराम गरड, हिवरा येथे सरपंच शामराव तौर, चेअरमन दिपक गुंजकर, उपसरपंच गोविंद आडे, मधुकर चौरे, गव्हाणथडी येथे मुरली चौरे, गंगाधर चौरे, लहू नेहरकर, गोविंद चौरे, जनक चौरे, डुब्बाथडी येथे गोविंद तौर, प्रकाश तौर, आनंद तौर, काळेगाव थडी येथे नागनाथ वक्ते, बबलू तौर, सतिष तौर यांच्यासह मान्यवर मौठ्या संख्येने उपस्थित होते.