बीड (रिपोर्टर): अनुसूचीत जातीच्या लोकांना विविध योजनेचा लाभ घेताना ग्रामपंचायतचा ठराव बंधनकारक असतो मात्र सदरील या ठरावाच्या संदर्भात नियमात बदल करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी वंचितच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. घरकुलसह इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रा.पं.स्तरावर ठराव बंधनकारक आहे मात्र हा ठराव देताना ग्रा.पं. सरपंच व इतर सदस्य लाभार्थ्यांना मानसिक त्रास देत असतात. त्यासाठी अनुसूचीत जातींना लाभ देताना ग्रा.पं. ठराव बंधनकारक करू नये या मागणीसाठी वंचितने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.