बीड (रिपोर्यर): पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे नवीन टार्गेट आल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता टाकण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हप्ता टाकण्यापूर्वी लाभार्थ्यांची आधार सिडींग करणे गरजेचे आहे. बीड तालुक्यातील अकराशे लाभार्थ्यांची आधार सिडींग करणे बाकी असून संबंधित लाभार्थ्यांनी तात्काळ आधारसिडींग करून घेण्याचे आवाहन पंचायत समितीकडून करण्यात आले. ज्यांची आधारसिडींग झाली त्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसात पहिल्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत.
बीड तालुक्यामध्ये मोठ्याप्रमाणात घरकुल आलेले आहेत. घरकुल आल्यानंतर लाभार्त्यांची आधार सिडींग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 1100 लाभर्थ्यांनी अजूनही आपले आधारकार्ड दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांची आधारसिडींग रखडलेली आहे. ज्यांची आधारसिडींग झाली त्यांच्या घरकुलाचा पहिला हप्ता येत्या काही दिवसांमध्ये पडणार आहे. दरम्यान, रमाई घरकुलाचे प्रस्ताव काही सरपंच आणि ग्रामसेवकांनी अद्यापही पंचायत समितीकडे दिलेले नाहीत. त्यांनी मार्च एन्डपूर्वी प्रस्ताव देणे गरजेचे आहे, अशा सूचना पंचायत समिऋतीच्या अधिकार्यांसह जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.










