सात सदस्यांच्या कोअर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंना स्थान
मुंबई (रिपोर्टर): आगामी होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाची संघटन बांधणी, धोरणात्मक निर्णय, जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. या कोअर ग्रुपमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना स्थान देत पक्षाने ना. मुंडेंवर एक मोठी जबाबदारी दिली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत चांगले यश प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत करत आहे. त्याअनुषंगाने पक्षाची संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणीसाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. हा ग्रुप आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमापासून पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणार आहे. या कोअर ग्रुपमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ना. मुंडेंवर मोठी जबाबदारी दिली आहे.
ना. मुंडेंवर आरोपच नाही, कारवाईचा प्रश्नच नाही -अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमिं अजित पवार यांनी अन्न व पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधकांकडून सातत्याने आरडाओरड होत असते, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये अजित दादांसह पक्षाने स्पष्ट भूमिका घेतल्याचे सांगण्यात येते. अजित पवारांनी स्पष्टपणे म्हटले, की, मी याआधीही म्हटले आहे, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही, आताही तेच सांगतो.धनंजय यांच्यावर आरोपच नाही तर मग राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी म्हटल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हेत र अवघा धनंजय मुंडे यांच्या सोबत असल्याचे सांगीतले.