नगर पंचायतच्या ढिसाळपणावर नागरीकात संताप
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील चिंचवण रोडवर असलेल्या पंतगे ट्रेडर्सला आज सकाळी 7 वा.सुमारास अचानक भिषण आग लागली असून दुपारी 12.30 वाजेपर्यत आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. सदरील आग विझविण्यासाठी अग्निशामकच्या पाच गाड्याना पाचारण करण्यात आले होते. तर या आगीत कोट्यावधी रुपायाचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर वडवणी न.प. तील स्वतंत्र अग्निशामकची गाडी असून देखील त्या गाडीला जवळपास अडीच तास उशीर लागला हे विशेष असल्याने आग लागली होती, लोक पाहत होते. तर वडवणी नगरपंचायतीचा ढिसाळ कारभाराचे नुमना पाहिला…असा शब्दात प्रथमदर्शी लोक संताप व्यक्त करत आहेत.






याबाबत आधिक माहिती अशी कि, शहारातील चिंचवण रोडवरील गेल्या अनेक वर्षापासून विशाल विलास पंतगे यांचे बांधकाम साहित्याचे पंतगे ट्रेडर्स म्हणून नांमाकित दालन आहे. या दुकानाला आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली आहे. आग कशामुळे लागली आहे. हे कारण समजू शकले नसले तरी हि आगीची तिव्रता खूप मोठी मोठी होती. या दुकानाचे बांधकाम काँलमचे असून देखील त्याला आगीने तडे गेले आहेत. तर दुकानातील बांधकाम व्यवसायाचे सर्वच साहित्य जळून खाक झाले असल्याचे दिसून येत आहे. सकाळी आग लागली परंतु वडवणी न.प. तीला स्वतंत्र अग्निशामक गाडी आसताना देखील ती गाडी घटना घडल्यापासून 9.32 मिनिटाने म्हणजे अडीच तासने गाडी घटनास्थळी पोहचली. तेव्हा माजलगांव, बीड आणि धारुर याठिकाणाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तर हि आग पाच अग्निशामक गाड्याने आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहेत. तर दुपारी 12.30 मि. पर्यत आग आटोक्यात आली होती, परंतु पुर्णपणे बंद झालेली नव्हती. सदरील घटनास्थळीची आग पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर पंतगे ट्रेडर्सला आग 7 वा. लागली होती. तर लोक पाहत राहिले परंतु या घटनने वडवणी नगरपंचायतीचा कारभाराचा नुमना आज हजारो घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी पाहितला हा विशेष तर चार अग्निशामक गाड्यावर प्रशिक्षर्थी कर्मचारी देखील दिसून आले नाहीत. यामुळे देखील आग आटोक्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. तर घटनास्थळी पोलीस प्रशासन बघणाऱ्यांची गर्दी दिसून आली होती. तर दुपार पर्यत आग सुरु असल्याचे दिसून आले आहे.
चालकाने फोन उचलला नाही – सिओ
सदरील घटनेतील आग ज्वालामुखी प्रमाणे होती. गाडी उपलब्ध आणि तत्पर होती. परंतु सकाळी या गाडी चालकाने फोन न घेतल्यामुळे अग्निशामक गाड्या या माजलगांव आणि धारुर येथून बोलविण्यात आल्या आहेत. मी यामध्ये स्वता फोन केला आहे. अशी प्रतिक्रिया वडवणी न.प.मुख्यधिकारी पोपट निगळ यांनी दिली आहे.
चर्चाना उधान
सदरील घटनास्थळी वडवणी येथील अग्निशामक गाडी हि उशीरा आली तेव्हा घटनास्थळीच त्या गाडीत डिसेल भरण्यात आले आहे. असे प्रथमदर्शी असणाऱ्या लोकामधून सांगण्यात आले आहे. तर याबाबत सिओ पोपट निगळ यांना विचारले आसता गाडीत डिसेल कमी असेल म्हणून भरले असेल अशी सांगत गाडी कुठे जाते हे मला माहित नसते. अशी प्रतिक्रिया देत माहिती दिली आहे.