बीड, (रिपोर्टर) ः शिरूर तालुक्यात हिवरसिंगा येथे एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी आज त्या ठिकाणी धाड टाकली. त्यामध्ये 14 लाख 50 हजार 320 रूपये किंमतीचा विमल गुटखा आढळून आला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडू निवृत्ती जाधव (रा.हिवरसिंगा) याच्या घरामध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबर्याव्दारे कळाल्यानंतर आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने जाधव याच्या घरी धाड मारली असता घरात 14 लाख 50 हजार 320 रूपये किंमतीचा विमल गुटखा आढळून आला. याप्रकरणी आरोपी जाधव याच्या विरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीराम, पोलिस हवालदार अशोक, दिपक सोमनाथ, बाळू, अर्जुन, नारायण, सिध्देश्वर यांनी केली आहे.