बीड, (रिपोर्टर)ः- समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडीयावर कोणीही टाकू नयेत जर कोणी टाकल्या तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी म्हंटले आहे. तसेच नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. सोशल मिडीयावर अनेक लोक वेगवेगळ्यापध्दतीच्या पोस्ट करत आहेत. या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जावू लागला. सोशल मिडीयावरील युट्यूब, फेसबूक, इन्स्ट्राग्राम, टेलिग्राम, व्हॉटसअॅप इत्यादी माध्यमांवर कोणीही आक्षेपार्ह व सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये व त्या शेअर ही करू नये. वादग्रस्त पोस्ट टाकणार्या विरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरीकांनीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.








