बीड : खोक्या ऊर्फ सतीश भोसले याचे एकेक कारनामे समोर येत असताना आता या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही आरोप केले जात आहेत. खोक्या भोसलेने शिकार केलेल्या हरणाचे मटण सुरेश धस यांनाही पोच केले जात होते, असा आरोप टी.पी. मुंडे यांनी केला आहे.
टी.पी. मुंडे यांनी शनिवारी (दि. 8) शिरूर कासार येथे भेट दिली. खोक्या भोसलेने अन्याय केलेल्या ढाकणे कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. शिकार केलेल्या हरणाचे मटण सुरेश धस यांना पोचते केले जाते. त्यामुळेच सतीश भोसले याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, असा गंभीर आरोप टी.पी. मुंडे यांनी केला. खोक्या आणि त्याचे साथीदार चार-दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचे, असेही मुंडेंनी म्हटले आहे.