बीड, (रिपोर्टर) ः
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचे सामाजिक वातावरण गडूळ झाले. जिल्ह्यात सदभावना निर्माण करण्यासाठी कालपासून काँग्रेसच्या वतीने मस्साजोग येथून सदभावना यात्रेला सुरूवात करण्यात आली. या यात्रेचा मुक्काम रात्री नेकनूर येथे होता. सकाळी 7 वा. यात्रा बीडकडे निघाली. दुपारी पालीमध्ये मुक्काम झाला. संध्याकाळी बीडमध्ये यात्रा येणार असून नाट्यगृहामध्ये सभा होणार आहे. या सभेला प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे मार्गदर्शन करणार आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण गडूळ झाले. जिल्ह्यामध्ये पुन्हा सदभावना निर्माण करण्यासाठी काँग्रेसने मस्साजोग ते बीड अशा यात्रेचे आयोजन केले. काल मस्साजोग येथून यात्रेला सुरूवात झाली. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. रजनीताई पाटील, माजीमंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील, पृथ्वीराज साठे, सुशिला मोराळे, राहुल सोनवणे, दत्ता बारगजे, निवृत्त न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्यासह आदींचा या यात्रेमध्ये सहभाग आहे. रात्री नेकनूर येथील प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात मुक्काम होता. सकाळी 7 वा. पुन्हा यात्रेला सुरूवात झाली. दुपारी यात्रा पाली येथे आली होती. दुपारचे जेवण घेतल्यानंतर यात्रा बीडकडे कुच करत आहे. संध्याकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात यात्रेचा समारोप होणार असून प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे मार्गदर्शन करणार आहेत.








