बीड (रिपोर्टर):- निवडणुकीत किती उमेदवार उभा राहतात याचे मोजमाप राहिलेले नाही. कोणी हि येत उभा राहत, कुणी हि येत पैसाच्या मस्तीवर निवडणुकीत उभा राहत अशी परस्थिती दुदैवाने झाली आहे. मागील निवडणुकीत तर एका उमेदवाराने 45 कोटी रुपये तर दुसऱ्याने 35 कोटी रुपये खर्च केले लोक सांगतात म्हणून मी सांगतो दहा-बारा कोटी पर्यत मर्यादित राहिलो परंतु मी निवडून आलो असं माजलगांव विधानसभा मतदार संघाचे आ. तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाषणात मत व्यक्त केले आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, काल वडवणी शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकाम भूमिपुजनचा कार्यक्रम आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर युवा नेते जयसिंग सोळंके, डाँ. अशोक थोरात, तोंडे, शेषेराव जगताप, संभाजी शिंदे, बन्शी मुंडे, बजरंग साबळे, युवराज गोंडे, महादेव उजगरे, सर्जेराव आळणे, बीडिओ विठ्ठल नागरगोजे, डाँ. निपटे, बोराडे यांच्यासह आदि मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आ.प्रकाश सोळंके भाषण करताना पुढे म्हणाले कि, पैसेच निवडणुक जिंकण्यासाठी लागतात असे काही नाही. सामान्य माणसाचा विश्वास आणि न्याय मिळवून देणे हे राजकारणात महत्वाच पैसा दुय्यम ठरतो. म्हणून हिच परस्थिती पुढील काळात हि राहिल हि अपेक्षा करु. अस म्हणत जयसिंगभैय्या यांचे नाव घेतले आणि व्यासपीठावर एकच हस्स झाले. तर माजलगांवच नविन आमदार म्हणून येत, नशिब म्हणावे त्याला आमदार व्हायचं असतं, नविन पैलवान असतो अंगात भिनलेले असते. म्हणून म्हणतो लागू द्या किती पण पैसे. यात आम्हाला फेस करावं लागतं अशी परस्थिती आहे. आता निवडणुकीचा काळ संपलेला आहे आपआपसातले जे काही राजकिय मतभेद आहेत. ते बाजूला ठेवून आपण सर्वानी एकत्र येऊन लोकांच्या विकासाच्या दृष्टीने मतभेद आडवे येणार नाहीत असे प्रयत्न करुयात असं म्हणत पैसाच्या मस्तीवर निवडणुकीत उभा राहत आहेत. अशी दुदैवाने परस्थिती झाली आहे. मागील निवडणुकीत एकाने 45 कोटी रुपये तर दुसऱ्याने 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. असे लोक सांगतात दहा-बारा कोटी पर्यत मर्यादित राहिलो परंतु मी निवडून आलो असे मुश्किल मत यावेळी व्यक्त केले आहे.