बीड, (रिपोर्टर)ः- बौध्द गया येथील महाबोधी विहार पुर्णपणे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. सदरील हे आंदोलन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बिहार राज्यातील बौध्द गया येथे तथागत गौतम बौध्द यांना ज्या ठिकाणी बौध्दतव प्राप्त झाले ते जगभरातील बौध्द बांधवांचे प्ररेणा व श्रध्दास्थान बौध्द गया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे याबाबत 1949 रोजी महाविहार व्यवस्थापन करण्यासाठी जो कायदा करण्यात आला तो कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हे जगभरातील बौध्द अनुयायी व भिक्कू संघ यांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज रिपाइंच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राजु जोगदंड, शाहु डोळस, किसन तांगडे, मजहर खान, महेश आठवले, मायाताई मुसळे, अविनाश जोगदंड, बाळासाहेब गव्हाणे, भैय्या मस्के, नवनाथ डोळस, श्रीमंत जाधव, कैलास जोगदंड, गौतम कोरडे, भास्कर जावळे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.