आष्टी पोलिसांकडून एक संशयित ताब्यात
आष्टी, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे रोजच निघतांना दिसून येत आहेत. काल संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने केलेल्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेली असतांनाच आज आष्टी तालुक्यातल्या पिंपरी घुमरा येथे 25 वर्षाच्या ट्रक चालकास ट्रक मालकाच्या कुटूंबियांनी डांबून ठेवत प्रचंड मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरून सोडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. संबंधित तरूणाला नेमके कशामुळे मारहाण झाली हे मात्र समजू शकले नाही.

या बाबत अधिक असे की, विकास आण्णा बनसोडे हा 25 वर्षाचा तरूण मागील तीन वर्षापासून आष्टी तालुक्यातील घुमरी येथील क्षीरसागर कुटूंबियांकडे ट्रक चालक म्हणून काम करत होता. परंतु मागील काही महिन्यापुर्वी त्याला कामावरून काढल्याने सांगण्यात येते. मयत विकास बनसोडे हा पिंपरी या गावात मित्रासह दोन दिवसापुर्वी आला होता. यावेळी ट्रक मालकाने विकासला पकडले. त्यावेळी त्याचे दोन मित्र पळून गेले. विकासला पकडल्यानंतर संबंधित ट्रक मालकाने त्याला डांबून ठेवलेृ व शनिवारी रात्री त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा खून झाला. त्यानंतर त्या लोकांनी त्या ट्रक चालक विकास बनसोडेचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहून टाकला तेथून विकासच्या घरच्यांना फोन केला. विकासच्या भावाने तो फोन उचलला तेव्हा बाबासाहेब क्षीरसागर यांनी तुझा भाऊ इकडे आला आहे. त्याला येथून घेवून जा… असे म्हंटले. आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो असता कडा येथील रूग्णालयामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुना आहेत. माझ्या भावाचा खून केल्याचे विकासच्या भावाने माध्यमांना म्हंटले. या घटनेने आष्टी तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. सदरची घटना अत्यंत गंभीर असून आष्टी पोलिसांनी यात एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. क्षीरसागर कुटूंबियांनी विकास यास डांबून का ठेवले, त्याला मारहाण का केली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र विकासची क्रुरपणे हत्या करण्यात आली. दलित तरूणाचे हत्याकांड झाले आहे. आरोपींना फाशी झाली पाहिजे अशा आशयांची मागणी ऑल इंडिया पॅथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी म्हंटले आहे.दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.