पाटोदा, (रिपोर्टर)ः- सतिश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर बुलडोजर चालवून ते घर पेटवून देण्यात आले. या प्रकरणात दोषी विरोधात कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
काही दिवसापुर्वी सतिश भोसले याला पोलिसांनी अटक केली. तो ज्या ठिकाणी राहत होता ती जमीन वनविभागाची होती. वनविभागाने सदरील त्याचे घर जेसीबीने उध्दवस्त केले. त्यानंतर अज्ञात लोकांनी त्याचे घर पेटवून दिले. यामध्ये काही शेळ्या, कोंबड्या, बदके मरण पावले आहेत. भोसले कुटूंबियांतील महिलांना देखिल मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. सतिश भोसले याच्यावर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून ते रद्द करण्यात यावे. त्याचे वडील भाऊ बहिण व इतर नातेवाईकांवर अन्याय करणार्या पोलीस कर्मचारी, गावगुंडावर अॅट्रोसिटी विनयभंग अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या वतीने पाटोदा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शंकर जाधव, नरेंद्र जावळे, बाबासाहेब जावळे, तात्यासाहेब गांगोर्डे, अमोल काळे, सुग्रीव पवार, गोरख झेंड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.