किल्ले धारूर (रिपोर्टर): धारूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धारूर आगारांमधील बस या खिळखिळ्या झालेल्या असून त्यामुळे इतर वाहनांना व इतर प्रवाशांना धोका होऊ शकतो, या गाड्यांमधील काही गाड्यांचे छप्पर गायब झालेले आहे तर काही दरवाजांमध्ये दोरीने दरवाजे बांधलेले आहेत काही खिडक्यांना काच नाहीयेत अशा अनेक समस्यांना धारूर तालुक्यामधील जनतेला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे धारूर तालुक्यातील प्रवाशांमध्ये संतपता निर्माण झाली आहे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धारूर बस आगारातील एसटी क्रमांक एम एच 09एफ एल 0323 मुंबईवरून धारूर येथे शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान आली असता या गाडीला पाठीमागच्या बाजूचे पूर्णपणे पत्रा लोंबत असला ला दिसून येतो त्या पत्र्याच्या लोंबतते पणामुळे इतरांना धोका होऊ शकतो किंवा तो पत्रा इतरांना लागून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच धारूर आगारातील अनेक बस गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत यावरून असे लक्षात येते की धारूर आगारातील बस गाड्या या निकृष्ट दर्जाच्या आहेत व त्या गाड्या तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात असे प्रवाशांमधून बोलले जात आहे.
धारूर आगारात नवीन बसेस लवकरात लवकर आणाव्यात कारण जुन्या झालेल्या बस हे मोडकळीस आलेल्या आहेत त्या बसेस मध्ये कसल्याही प्रकारची सुविधा आढळून येत नाही व रस्ते हे गुळगुळीत झालेले असताना देखील लांब पल्ल्याच्या प्रवास करत वेळेस लोकांना कमरेचा त्रास सुद्धा जाणवत आहे, असे एका प्रवाश्याने सांगितले.