गेवराई ,(रिपोर्टर)ः- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथे पाणी टँकर सुरु करावे यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव हे गावातील मंदिरात बुधवारपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान आज चौथ्या दिवशी देखील प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. आज सकाळपासून त्यांची तब्येत खालावली असून चार दिवसांत कोणताही प्रशासकीय अधिकारी या आंदोलनस्थळी फिरकला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान शरद जाधव यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.

पौळाचीवाडी येथे मागील महिण्यापासून तिव्र पाणी टंचाई आहे. याबाबत गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन देखील दखल घेतली नाही. परिणामी गावात सध्या पिण्याच्या पाण्याची नागरिकांना भ्रांत असून पाण्याच्या शोधात नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून पाणी टंचाईमुळे गावात तात्काळ पाणी टँकर सुरू करण्यात यावे, गावातील अमृता नदीवरील बंधार्यातुन गाळ ऊपसा करण्यात यावा, संजय गांधी यासह श्रावण बाळ योजनेत पौळाचीवाडी गावातील गोरगरीब लोक घ्यावेत, पौळाचीवाडी ते तरडगव्हान रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, खळेगाव ते बंगाली पिंपळा रस्ता व खळेगाव ते ऊमापुर रस्ता डांबरीकरण करण्यात यावा या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव हे पौळाचीवाडी येथील मंदिरात बुधवारी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र चार दिवस उलटून देखील या आंदोलनाकडे प्रशासनाचा कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या समस्या बाबत प्रशासन उदासीन असल्याचे यावरून दिसून येते. दरम्यान शरद जाधव यांच्या या आंदोलनाला अनिल शेंडगे, सुदाम पवार, पाराजी गायकवाड, रामनाथ मराठे, आण्णासाहेब साळुंखे, सिद्धेश्वर घार्गे, अर्जुन जाधव, धर्मराज पौळ, पांडुरंग जाधव, बबनराव माने, पिंटू पौळ, आर्जुन पौळ, श्रीमंत शेंडगे, सुरेश शेंडगे, रामनाथ पिकवणे ,बिभीषण पठाडे, मछींद्रनाथ पौळ, भिमराव पिकवणे, जालींदर धुमाळ, गोरख साळुंखे, भाऊसाहेब पिकवणे, रामजी तुळसीराम पौळ, भारत साळुंखे, कचरू पौळ पाटील, महादेव महाराज पौळ, हनुमान मैंद, कृष्णा पौळ, भारत अशोक पौळ आदींसह ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.