
बीड (रिपोर्टर): एटीएमची अदलाबदल करून एकाच्या खात्यातील 31 हजार रुपये काढल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विश्वंभरराव खटाळकर (रा. संभाजीनगर, माजलगाव) यांच्या एटीएमची अज्ञात व्यक्तीने अदलाबदल करून गेवराई येथील एटीएम मशीनमधून त्यांच्या खात्यातील 31 हजार रुपये काढून घेतले. सदरील हा प्रकार खटाळकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.