बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा रूग्णालयामध्ये प्रसृतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका 40 वर्षीय महिलेचा प्रसृतीनंतर मृत्यू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळांत महिला दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून दोषी डॉक्टराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जो पर्यंंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दुपारी 1 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

छाया गणेश पांचाळ (वय 40, रा.आंबिलवडगाव) या महिलेस प्रसूतीसाठी जिल्हा रूग्णालयामध्ये दि.11 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. रात्री महिलेची प्रसृती झाली. तिला मुलगा झाला, प्रसृतीनंतर प्रकृती बिघडली. अतिरक्तस्त्राव झाल्याने महिला दगावली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला मरण पावल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी दोषी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दुपारी 1 वाजे पर्यंत या प्रकरणाचा तिढा सुटलेला नव्हता.






