बीड, (रिपोर्टर)ः- सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून भारतामध्ये दरवर्षी जर साप चावल्यामुळे मृत्यूमुखी होणार्या व्यक्तींचे प्रमाण पाहिले तर ते साठ हजार पेक्षा देखील जास्त आहे. साधारणपणे साप चावल्याच्या घटना या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोकांचे शेतीशी निगडित कामे असल्यामुळे त्यांना शेतात जायला लागते.
बर्याचदा रात्री-बेरात्री देखील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी बंधूंना शेतात जायला लागते व अशाप्रसंगी साप चावल्याच्या घटना घडतात व लोकांना प्राण गमवावा लागतो. तसेच ग्रामीण भागामध्ये वेळेवर पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने देखील या घटनांचे प्रमाण जास्त आहे

असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यात झालेला आढळून आला. उर्मिला लहाने या महिलेला घोणस या विषारी सापाने दंश केला. पण बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर निलेश मिसाळ यांनी वेळेची तत्परता दाखवत त्या महिलेचे प्राण वाचवले. घोणसाचे विष अतिशय जहाल असते.त्याचे विष तरीर्लीश्रेीेुंळल प्रकारचे आहे. विषाच्या या गुणधर्मामुळे रक्त पातळ होते आणि गोठण्याची क्षमता कमी होते यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. चावलेल्या पायावर सूज येणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे. या गंभीर स्थितीत डॉ.निलेश मिसाळ यांनी स्नेक अॅन्टीव्हेनम औषध दिले. आणि रुग्णाचे प्राण वाचवले.
या अनुषंगाने जर आपण डॉक्टर निलेश मिसाळ यांचे कार्य पाहिले तर त्यांनी साप चावलेल्या व्यक्तींचे जीव वाचवलेले आहेत. विशेष म्हणजे डॉक्टर निलेश मिसाळ हे सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत.