• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

by गणेश सावंत
June 2, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मयतात दोन महिलांचा समावेश, अपघात एवढा भीषण रिक्षा पन्नास फूट फेकला गेला, आयशर टेम्पोसह चालक फरार, रात्री अकरा वाजता माजलगाव-तेलगाव रोडवर घडली घटना
माजलगाव (रिपोर्टर): तेलगावकडून माजलगावकडे रिक्षाने जात असलेल्या प्रवाश्यांना समोरून येणार्‍या भरधाव आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह पाच जण जागीच ठार झाले. तर यात अन्य तिन ते चार जण जखमी असून जखमींना माजलगाव येतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर एका महिलेस संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. उपचारा दरम्यान आज सकाळी संभाजीनगर येथे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. हा अपघात एवढा भयानक होता की, आयशर टेम्पोने रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा 50 ते 60 फूट दूर फेकला गेला. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव रस्त्यावर असलेल्या नित्रूड जवळच्या एका पेट्रोल पंपासमोर घडला. याच रस्त्यावर काल अन्य एक अपघात झाला होता. त्यामध्ये एक ठार झाल्याचे सांगण्यात येते.


   माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही रहिवासी तेलगावकडून रिक्षा (क्र. एम.एच. 23 एन. 0273) यामध्ये बसून माजलगावकडे जात होते. रात्री अकराच्या सुमारास त्यांची रिक्षा नित्रूड पेट्रोल पंपासमोर आली असता समोरून आयशर टेम्पो (क्र. एम.एच. 23 एम. 9255) हा भरधाव वेगात आला आणि त्याने रिक्षाला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, रिक्षा जवळपास 50 ते 60 फूट दूर फेकला गेला. त्यामुळे रिक्षामध्ये बसलेले प्रवासी काही रिक्षा बाहेर फेकले गेले तर काही रिक्षातच अडकले. या अपघातात फारूक चांद सय्यद, त्यांची पत्नी सय्यद शबाना फारूक, शेख नोहिद एजाज यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यात तीन ते चार जण जखमी असून जखमींना माजलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सराहा अनवर पठाण (रा. भाटवडगाव) यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र आज सकाळी उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात सकाळपर्यंत पाच जण मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. राि या अपघाताची माहिती िदिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांना झाल्यानंतर त्यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खालील मोमीन, सचीन गायकवाड, कानदास बनसोडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षाला धडक दिल्यानंतर आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रात्री अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चारही जणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन दुपारी एक वाजता चालू होते. या अपघाताने भाटवडगाव गावावर शोककळा पसरली आहे.

माजलगाव-तेलगाव रस्ता यमाचे द्वार
मेहकर-पंढरपूर पालखी महामार्गावरील माजलगाव-तेलगाव हा रस्ता वाहन चालकांसाठी साक्षात यमाचे द्वार ठरत आहे. रस्त्यात मोठमोठ्या भेगा पडल्याने मोटारसायकलचे चाक त्यामध्ये अडकऊन अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. काल या रस्त्यावर दुचाकीस्वारास ट्रकने धडक दिल्याने महारुद्र लोंढे यांचा जागीच मअत्यू झाला तर त्यांच्या पत्नी यात जखमी झाल्या होत्या. त्यानंतर रात्री रिक्षा आणि आयशर टेम्पोचा अपघात होऊन पाच जण ठार झाले आहेत.

Previous Post

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं

Next Post

गोपीनाथरावांच्या समाधीशी अनुयायी नतमस्तक

संबंधित बातम्या

बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
क्राईम

माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना रंगेहात; पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी

by गणेश सावंत
January 28, 2026
क्राईम

माजलगाव तालुक्यात धाडसी चोरीअकरा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post

गोपीनाथरावांच्या समाधीशी अनुयायी नतमस्तक

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?