तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल, गुटख्यासह रिक्षा असा 4 लाखाचा माल जप्त

बीड, (रिपोर्टर) ः बीड शहरातील हत्तीखाना, कागदी दरवाजा येथे एका घरामध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून मोठठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला. गुटख्यासह रिक्षा असा एकूण 4 लाख 47 हजार 909 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हत्तीखाना, कागदी दरवाजा, हफीफ गल्ली जुना बाजार या ठिकाणी एका घरात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून विविध कंपनीचा गुटखा, पानमसाला, तंबाखू, अॅपेरिक्षा असा एकूण 4 लाख 47 हजार 909 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरील ही कारवाई पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय शितलकुमार बल्लाळ व एपीआय बाबा राठोड, पीएसआय नेवरे, जयसिंग वायकर, अशफाक सय्यद, सुशिल पवार, मनोज परजने यांनी कारवाई केली आले. याप्रकरणी सुभाष भास्करराव तांबारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोमीन मोहम्मद तकियोदद्दीन, शोएब खान वाजेद पठाण, वाजेद खान नय्युम खान पठाण या तिघां जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.