राजुरी सर्कलसह आदी भागात पाणीच पाणी
बीड, (रिपोर्टर) ः बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून कोठे न कोठे अवकाळी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले. 100 एक्कर पेक्षा जास्त फळबागाचे क्षेत्र बाधित झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान नवगण राजुरी सर्कलसह गेवराई तालुक्यातील काही भागात धुवाधांर पाऊस पडला. या पावसामुळे पाणीच पाणी झाले होते.
गेल्या काही दिवसापासुन राज्यातल्या विविध भागात अवकाळी पडत आहे. या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान देखील झाले आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे अंबा, मोसंबी, केळी, चिकू, लिंबू यासह इतर शेती पिकाचे नुकसान झाले. 100 एक्करपेक्षा जास्त क्षेत्रात फळबागाचे क्षेत्र बाधित झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान नवगण राजुरीसह गेवराई तालुक्यातल्या काही सर्कलमध्ये वादळी वार्यासह पाऊस झाला आहे. या पावसामुळे त्या परिसरात पाणीच पाणी झाले होते.