बीड -ऑनलाईन रिपोर्टर
पोलीस अधिकाऱ्यांसह राज्यातील अनेक आमदार खासदार मंत्र्यांनी विरोधात अक्षपहारी भाष्य करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आज दिल्लीतून अटक करण्यात आली मुंबईच्या गुन्हा अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले रणजीत कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या पाठोपाठ मुंबईसह अन्य ठिकाणीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत बीडमध्ये मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात अक्षपर्य विधान केल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यावरून त्या कासले रोगात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लवादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले याच्यावर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारींवरुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरुन सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे. तर दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मिडीयातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी ही तक्रार दिली आहे. या दोन्ही तक्रारींवरुन बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
जामीन मिळाल्यानंतरही आरोप सत्र सुरूच
दरम्यान, रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबई तही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता नव्याने दोन गुन्हे दाखल झाल्याने कासले समोरील अडचणी वाढण्याची शक्यता असतानाच रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोप सत्र सुरूच ठेवले होते. अशातच शनिवारी (25 मे) रणजित कासले याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.