बीड -ऑनलाईन रिपोर्टर
राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यातील नावांची घोषणा करण्यात आली नव्हती अखेर आज त्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २२ नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.मराठवाड्यातील बीड नांदेड लातूर जिल्हाध्यक्षाच्या निवडी झाल्या नव्हत्या बीड भाजपा जिल्हाध्यक्ष निवड हि पंकजा मुंडे ,सुरेश धस यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे थांबल्याचे सांगण्यात येत होते अखेर आज भाजपकडून जिल्हाध्यक्ष म्हणून शंकर देशमुख यांची अधिकृत निवड करण्यात आली .त्यांच्याकडे बीड जिल्हाध्यक्षाचे प्रभारी पद होते
भाजपाकडून आज जाहीर करणयात आलेल्या जिल्ह्याध्यक्षांच्या यादीमध्ये पालघरच्या जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत, वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते, नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिणच्या अध्यक्षपदी सुनील बच्छाव, नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम, पुणे दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर वडणे, कोल्हापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.









