मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कुटुंबास दिली भेट
बीड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील:वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे नुकत्याच झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांत्वनपर भेट दिली व शासनामार्फत श्रीमती छबुबाई पिराजी राठोड यांना सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वितरण केले.या प्रसंगी मंत्री राठोड यांनी कुटुंबियांची भावनिक समजूत घेतली आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. सानुग्रह आर्थिक सहाय्य देण्यात आले असून, याशिवाय पुढील मदतीसाठीही शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजलगाव चे तहसीलदार, गट विकास अधिकारी, बंजारा समाजाचे पि,टी ,चव्हाण, बाबुराव जाधव, शरद चव्हाण, जीवन राठोड, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, प्रशासनातील अधिकारी तसेच मयतांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मंत्री राठोड यांच्या या दौर्यामुळे पीडित कुटुंबीयांना थोडासा दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांनी त्यांच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे.