
कुक्कडगाव येथील प्रवाशांची तक्रार
बीड, (रिपोर्टर)ः- एसटी महामंडळाच्या बसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. काही वाहक चालक प्रवाशांची व्यवस्थीत बोलत नसल्याच्या तक्रार येत असतात. अशा मुजोर कर्मचार्यांवर महामंडळाच्या अधिकार्यांनी कारवाई करायला हवी. कुक्कडगाव येथील प्रवाशांना बीड बसस्थानकात वाहक व चालकाने शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याची दखल वरिष्ठांनी घ्यायला हवी.
कुक्कडगाव ते बीड या दरम्यान एसटी बस आहे. प्रवास करण्यासाठी महामंडळाच्या आवारात कुक्कडगाव परिसरातील अनेक नागरीक बसची वाट पाहत थांबलेले असतात. काल चालक व वाहकाने काही प्रवाशास शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. बसमध्ये चढत असतांना हा प्रकार घडला आहे. पाच मिनिट बस थांबवा अशी मागणी प्रवाशांनी केली असता प्रवाशांनाच उध्दट पणाची वागणूक सदरील चालक व वाहकाने केली आहे. विशेष करून महिलांना अरेरावी करण्यात आली आहे. याची दखल एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घेवून अशा मुजोर कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.