
परळी, (रिपोर्टर)ः- टोकवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज गावकर्यांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आले.
परळी तालुक्यातील टोकवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसविणे गरजेचे आहे. वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी गावात गतीरोधक बसविण्यासाठी आज गावकरी रस्त्यावर उतरले. महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती. यावेळी टोकवाडीचे सरपंच गोदावरीताई मुंडे, राजाराम मुंडे, भरत मुंडे, बालाजी मुंडे, सुग्रीव मुंडे, वाल्मिक मुंडे, स्वाती काळे,संजय मुंडे, नवनाथ मुंडे, राजाभाऊ काळे, संदिपान काळे, संतोष पारधे यांच्यासह आदींची उपस्थिती हेाती. मागण्यांचे निवेदन तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना देण्यात आले.








