गेवराई (रिपोर्टर) भोगलगाव अंतर्गत रामगोपाल तांडा रस्त्याचे अडवलेले काम तात्काळ चालू करण्यात यावे या मागणी साठी शुक्रवार पासून तहसील कार्यालयासमोर गोर सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आसल्याचे आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील भोगलगांव येथील रामगोपाल तांड्यावर जाण्या येण्यासाठी जो सरकारी रस्ता आहे. त्या रस्त्याची पावसाळ्यामुळे परिस्थिती अत्यंत खराब झाली असून रस्त्यावर गुडघे इतके पाणी साचल्याने नागरिकांना येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला व रस्त्याचे काम चालू करण्यात आले होते. परंतु रस्त्या लगतच्या शेतकरी रस्ता अडवुन काम बंद पाडत आहे. हे काम तात्काळ चालू करावे या मागणीसाठी गोर सेना व गावातील नागरीकांच्या वतीने तहसील कार्यालय समोर दि.5 ऑगस्ट शुक्रवार रोजी आमरण उपोषण सुरू केले आसून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून प्रशासनाकडून कुठलीच दखल झाली नसून हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे. या आंदोलनात गोरसेनेचे संजय राठोड, सतिष पवार, बंडु पवार, जिवन आडे, विठ्ठल पवार, अंकुश पवार, संजय पवार, लहु राठोड, ज्ञानेश्वर आडे, रामेश्वर आडे, कृष्णा पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती आहे.