शिंदे गटाच्या पाठिशी भाजप; सुनावणी आणि मंत्रिमंडळाचा विस्ताराचा संबंध नाही -फडणवीस
मुंबई (रिपोर्टर) भाजपने सहा महिन्यांपासून 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्याचे काम आम्ही केले आहे. पुढची लोकसभेची निवडणूक भाजप-शिवसेना युतीमध्ये आम्ही लढणार आहोत. जे लोकं सध्या आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडणूक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे खासदार निवडणून आणण्यासाठी त्याचा वापर करू, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातला संत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयाच्या बदलत्या तारखांमुळे अधिक लांबण्याची चिन्हे आहेत. राज्याचे भवितव्य अवलंबून असणारी सर्वोच्च न्यायालयाची उद्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या याचिकेवर उद्या म्हणजेच 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, आता ती सुनावणी लांबणीवर पडली असून, उद्याची सुनावणी आता 12 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे, त्यावर फडणवीस बोलत होते.
राज्याचे अधिकार सचिवाकडे दिल्यानंतर विरोधी पक्ष टीका करताना पाहायला मिळत आहे त्यावर बोलताना, फडणवीस म्हणाले की, जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरीता डॉयलॉगबाजी करण्यात येते. याआधीच्या सरकारमध्ये देखील सचिवांना ते अधिकार होते. याआधी आमच्या सरकारमध्ये देखील अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. अर्धन्यायिक प्रकरणे वगळता मंत्रिस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत.
हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णय प्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे, असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, ही राज्यातच नाही तर देशात परंपरा आहे. हे सरकार जनतेचे असून, जनतेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे जनतेचे लोकंच महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतली.
सुनावणीचा आणि मंत्रिमंडळाचा संबध नाही
राज्यात सत्ता स्थापन होऊन महिन्यापेक्षा अधिकचा झाला असून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नये असे सांगितलेले नाही. सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नसून, तुमच्या विचाराआधी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
हे अजितदादांचे कामच आहे
पुढे फडणवीस म्हणाले की, अजित पवार हे मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करत आहेत. ते विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना हे बोलणे स्वभाविकच आहे. त्यांना हे विसरावे लागेल की, 30-32 दिवस त्यांच्या काळातही पाचच मंत्री होते. राजकारण हे बोलावेच लागते.
मी रिकामा टेकडा नाही
पुढे पत्रकारांनी शिंदे आणि ठाकरे एकत्र यावे यावर प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले की, कोण काय म्हणतोय याला राजकारणात महत्व नाही, परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व आहे. हा काय बोलता, तो काय बोलता यावर उत्तर देण्याइतका रिकामा टेकडा मी नाही.