
माजलगाव (रिपोर्टर): कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बाबत वादग्रस्त विधान करणार्या भाजपाचा मंत्री विजय शहावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज माजलगाव शहरात आझाद क्रांती सेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप नागरिका वरती गोळीबार करत मारले त्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवत कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर वैदिका सिंग यांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळावर हल्ले करून दहशतवाद्यांना समूळ नष्ट केले अशा जाबाज सैनिकांच्या पराक्रम व शौर्याच्या संपूर्ण देश कौतुक करत असताना मध्यप्रदेश सरकारमधील भाजपा मंत्री विजय शहा यांनी आम्ही अतिरेक्यांना मारण्यासाठी त्यांची बहीण पाठवली म्हणत बेताल व बेजबाबदार संताप जनक वक्तव्य करून आपल्या सैनिकांचा अवमान करीत त्यांचं मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला आहे अशा मंत्र्याला संविधानिक पदावरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही म्हणून महामहीम राष्ट्रपती यांनी विजय शहा याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आझाद क्रांती सेनेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी आझाद क्रांती सेना प्रमुख राजेश घोडे, तालुकाप्रमुख अशोक ढगे, तालुका सचिव किसन गोपाळ पैंजणे,भिसे सर, संदीप भिसे, अजून कुरेशी मोझम कुरेशी, सिद्धार्थ साळवे, भारत डोंगरे सुभान अली







