बीड, (रिपोर्टर)ः- बीड तालुक्यातील व्यैक्तीक लाभाचे मस्टर बंद करण्यात आले असून ते सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने पंचायत समितीच्या कार्यालयाच्या दारात तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वैयक्तीक लाभाच्या योजनेमधील 20 मागण्याची मर्यादा रद्दबातल करण्यात यावी जेणेकरून सर्व पात्र लाभार्थ्यांना संधी मिळू शकेल, विविध गावामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर वर्ककोड मोठ्या प्रमाणात डिलिट झाल्याने नव्याने वर्ककोड मंजूर करून मस्टर चालू करण्याची तात्काळ कारवाई करण्यात यावी, वैयक्तीक लाभाच्या कामाचे मस्टर तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच प्रलंबित कुशल निधीचे त्वरील वितरण करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बीड पंचायत समितीच्या दारात तिव्र निदर्शने केले. यावेळी सतिष शेळके, संतोष जाधव, आकाश जगताप यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.









