बीड, (रिपोर्टर)ः- राज्य सरकारने शेतकर्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहिर करून हे पैसे बँकेकडे वर्ग केलेले आहेत. बँकेतून पैसे काढण्यासाठी संबंधित शेतकर्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकर्यांनी ई केवायसी केली त्यांना पैसे मिळाले. मात्र ज्यांनी केलेली नाही त्यांचे पैसे बँकेत पडून आहेत. जिल्ह्यातील अजुनही 28 हजार 931 शेतकर्याची केवायसी झालेली नसल्याने त्यांचे 16.51 कोटी रूपये बँकेत पडून आहेत. सदरील शेतकर्यांनी ई केवायसी करून घेण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.
मराठवाड्यातील जवळपास 40 लाख हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने शेतकर्यांना नुकसान भरपाई जाहिर केली. ही नुकसान भरपाई बँकेमध्येे जमा झाल्यानंतर पैसे काढण्यासाठी शेतकर्यांना ईकेवायसी बंधनकारक करण्यात आली. ज्या शेतकर्यांची केवायसी होती त्या शेतकर्यांनी पैसे काढून घेतले मात्र ज्यांची केवायसी झाली नाही त्यांचे अद्यापही पैसे बँकेत पडून आहेत. जिल्ह्यातील 28 हजार 931 शेतकर्यांनी अजुनही ई केवायसी केली नाही. त्यामुळे या शेतकर्यांचे 16.51 कोटी रूपये बँकेत आहेत. जो पर्यंत केवायसी होत नाही तो पर्यंत त्यांना पैसे मिळणारनाहीत. सदरील शेतकर्यांनी केवायसी करून घेण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.







